पोस्ट्स

आम्ही गौताळ्याला गेलो, पण बिबट्याच दिसलाच नाही...

इमेज
        आम्ही गौताळ्याला गेलो , पण बिबट्याच दिसलाच नाही... गौताळा अभयारण्य मार्ग  गौताळा अभयारण्य हे औरंगाबाद आणि जळगांव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य आहे . औरंगाबाद पासून ६५   कि . मी .  अंतरावर   असलेलं हे अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय श्रीमंत आहे . विविध प्रजातींची वृक्षजाती , प्राणी , पक्ष्यांचा अधिवास असलेले दोन हजार सहाशे दहा चौ . कि . मी . क्षेत्र आहे . महाराष्ट्र शासनाने दि .  २५ फेब्रु . १९८६ रोजी अभयारण्य म्हणून घोषीत केले . या अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याचे एकोणीस हजार सातशे सहा हेक्टर तर जळगांवचे   सहा हजार तीनशे पंच्चावन्न हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे . अभयारण्यात बिबट्या , लांडगे , कोल्हे , रानडुकरे , नीलगायी , गवे यासह इतर ५४ प्रजातीचे प्राणी तर २३० प्रजातीचे पक्षी असल्याची नोंद  आहे . आमच्या प्रथम वर्षाचे प्रा. दत्ता कानवटे सर यांनी आमच्या वर्गामधी एकच घोषणा केली . ती   म्हणजे गौताळा...